सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

९ नोव्हेंबर २००८ मागच्या वर्षी

मागच्या वर्षी म्हणजे ९ नोव्हेंबर २००८ हा तसा म्हणजे आमचा अमेरिकेतला दुसराच रविवार होता. आज तसे विशेष असे काही न्हवते पण एक परफेक्ट सकाळ होती छान उन पडले होते. काल रात्री म्हणजे ८ नोव्हेंबर ला आम्ही चार रूम पार्टनर (मी, योगेश, विपिन आणि झयद म्हणजे बडे भैय्या)  बर्लीग्टन कोट कारखान्यात गेलो होतो खूप मोठे दुकान होते सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोट होते. एक २ तास गेले आवडता आणि अंगात व्यवस्थित बसणारा कोट शोधायला. विपिन जो अंगाने तसा बारीक आहे त्याच्या मापाचा कोट सापडत न्हवता मग अगदी लहान मुलांच्या विभागात पण शोधले आणि तिकडे एक मिळाला पण त्याचे हातुपे बारीक होते शेवटी कंटाळून तो राहूदे म्हणाला पण शेवटी एक शोधलाच. तिकडचे   होईपर्यंत ४.३० वाजले, अंधार पडायला सुरुवात झाली होती.

तसा तिकडे लवकर अंधार पडतो ह्या दिवसात. थोडी खरेदी करायची होती म्हणून एका इंडिअन स्टोर मध्ये गेलो. तिकडे म्हणजे अगदी पापड लोंच्यापासून पीठ, बासमती  तांदुळ इत्यादी सगळे ऐवज बघायला मिळाले.
 तर परत ९ नोव्हेंबरच्या सकाळ बद्दल बोलू, कालच बिस्वास, भावीन आणि अश्विन इंडियामधून आले होते तसे मी बिस्वास ला अगोदरच मिठाई आणायला सांगितली होती झयदला काजू कतली खूप आवडते त्यामुळे आवरून आम्ही चौघे हॉटेलला गेलो. अश्विनची रेंटल कार आणायला  ऐअरपोर्टला जायचे होते सो हॉटेल मध्ये जाऊन मस्त मिठाई खाल्ली आणि मग सगळे ऐअरपोर्टला गेलो. अश्विनला   क्रायस्लर ची पी टी कृजर गाडी मिळाली तशी थोडी विचित्र दिसत होती म्हणजे जुन्या काळातल्या गाडीसारखी.
गाडी पिक करून एका ठिकाणी त्यांच्या साठी घर बघायला गेलो. छान लोकेशन होते. फोटोग्राफी साठी एकदम परफेक्ट. म्हणजे तसे आमच्या तिघांचे काही काम न्हवते त्यामुळे किरकोळ फोटोग्राफी चालूच होती. साधारण १.३० च्या दरम्यान त्या चौघांना निरोप देऊन आम्ही तिथून निघालो. अजून जेवणाचा पत्ता न्हवताच.


 झयद बोलला होता इथे जवळच समुद्र आणि एक पोर्ट आहे मग त्याच्या मागे लागून तिकडे गेलो. पोर्ट चे नाव होते ग्रीनविच बे मरीना. पोर्ट म्हणजे खाजगी बोटींचा पार्किंग लॉट आहे तो. कित्येक महागड्या बोटी बांधून ठेवल्या होत्या तिकडे. निळाशार समुद्र आणि लाकडी पोर्ट ला बांधून ठेवलेल्या बोटी खूप छान नजरा होता. झयदभाई माहिती सांगत होते कसे असते. इथले लोक उन्हाळ्यामध्ये कशे मजा करतात मग थंडी ची सुरवात झाली कि बोटी कश्या घरी घेऊन जातात वगेरे वगेरे... उन जरी असले तरी हवे मध्ये खूपच थंडी होती.
 
तिकडे थोडे चांगले फोटो मिळाले काही नकली फोटो पण काडले जसा की हा.

अर्धा तास थांबून आम्ही घरचा रस्ता पकडला...तर असा होता माज्या मागच्या वर्षीचा आजचा दिवस