सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

१६ ऑक्टोबर - गद्धे पंचविशी


१६  ऑक्टोबर हो ह्याच दिवशी हा (म्हणजे मी ) निष्पाप जीव जन्माला आला ह्या गोष्टीला आज २००९ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. तशी शाळेत किंवा ऑफिशिअल जन्मतारीख १६ जुलै असल्यामुळे ऑफिस किंवा बाकीचे त्या दिवशीच शुभेच्छा देतात आणि सगळ्यांना सांगावे लागते, पण हल्ली आपल्याकडे सोशल नेटवर्किंग साईट ची रेलचेल असल्यामुळे मित्र मंडळीना समजून येते मग इ-मेल, स्क्रेप्स ह्या मधून शुभेछांचा वर्षाव होतो.
 तर ह्या १५ च्या रात्रीच मला शुभेच्छा यायला सुरु झाल्या. मला माझ्या रूम पार्टनर्स कडून काहीतरी विशेष असल्याची खबर  लागली होती पण बिचारे दिवसभर कम करून (?) दमुन आले होते त्यामुळे लगेच झोपून गेले. मी एकटाच माझ्या Laptop घेऊन वेळ घालवत बसलो होतो..तशी झोप पण येत न्हवती आणि काही फोन Calls अपेक्षित होते. बारा वाजता अमितचा अलार्म वाजला पण बिचाऱ्याने झोपेतच बंद केला. मी पण काही Calls घेतले काही Scarps ना उत्तरे दिली आणि झोपायची तयारी चालू केली. अमित ला १ वाजता जाग आली आणि तो बावरून विचारू लागला १२ वाजून गेले ? मग मला शुभेच्छा देऊन संदीपला उठवायचा एक प्रयन्त केला पण सगळे इतके कंटाळले होते कि उठलेच नाहीत. मग त्याने सांगितले कि सकाळी साजरा करू आणि झोपी गेलो.

      सकाळी लवकर उठायचं असे ठरून अलार्म लावला खरा पण नेहमीप्रमाणे तो बंद करून परत झोपलो. शेवटी संदीप ने सगळ्यांना जागे केले मग पटकन आवरून घेतले. आज ऑफिस मध्ये पण पारंपारिक कपड्यांमध्ये जायचे असल्यामुळे माझ्याकडे असणारा पांढरा शुभ्र कुर्ता आणि पायजमा घातला. मग काय सकाळी सकाळी फोटोसेशन केले.कार्यकर्त्यांनी टेबल सजवला केक ठेवला हातात उडवायचे फटाके आणले होते ते वापरले मेणबत्याऐवजी. मजा आली एकमेकांची तोंडे रंगवली आणि संदीप आणि मी ऑफिस साठी निघालो. जाता जाता वाकडी वाट करून सारसबागेतल्या गणपतीचे दर्शन घेतले.

      मधे थांबून ऑफिस मधल्या लोकांसाठी पेढे घेतले. तसे ऑफिसमध्ये आज खूप कमी लोक आले होते, आणि माझ्या युनिट मध्ये पण खूप कमी लोक आले होते. घरी राहिलेला केक ऑफिस मध्ये नाश्त्या वेळी खाल्ला बाकीचा डेस्क वरती आणून ठेवला आणि सगळ्या लोकांना ईमेल केला "स्वीट्स @ माय डेस्क". तसा आज काम पण करायची इच्छा न्हवती पण एक काम होते मग लगेच संपवून टाकले. सगळे आवरेपर्यंत १ कधी वाजून गेला ते कळलेच नाही. ऑफिसमध्ये ग्रुप फोटो साठी कॅमेरा घेऊन आलो होतो पण ज्यावेळी फोटो काढायला गेलो त्यावेळी लक्षात आले कि मेमरी कार्ड घरीच राहिले झालीका पंचायत पण ऐनवेळी गणेश मदतीला धावून आला आणि त्याचे कार्ड घेऊन फोटो काढले. लगेच आवरून ऑफिस मधून काढता पाय घेतला.

   आज उन खूप जास्ती होते गरम होत होते आणि त्यात ट्राफिक पण खूप होते. निम्म्या रस्त्यात आल्यावर लक्षात आले की घराची चावी नाहीये. आज असे का होत होते समजत न्हवते मग दवाखान्यात जाऊन अमित कडून चावी आणली. थोडासा फ्रेश होऊन माझी bagpack शोधू लागले तर सापडेनाच मग एक शंका आली की नक्की अप्पा घेऊन गेला असणार त्याला फोन करण्याअगोदर अमित ला विचारून नक्की करून घेतले. डोके जाम सटकले होते एक तर घरातून सारखे काळजीचे फोन कधी निघणार कधी पोहोचणार आणि इथे पिशवी गायब. कसेतरी संदीप ला समजावून त्याने भरून ठेवलेली त्याची पिशवी रिकामी केली आणि माझे साहित्य त्यात भरले. सगळे आवरता आवरता २.३० वाजले अजून गाडीच्या चेनला Oil घालायचे होते, टायर मध्ये हवा मारायची होती, घरच्यांसाठी बाकरवडी घ्यायची होती. उशीर तर झाला होता. पटापट सगळे आवरले आणि ३.०५ ला पुणे सोडले.

       माझा घरचा प्रवास चालू झाला. अंतर तसे २०० किमी आहे आणि ३-४ तास लागतात. जास्ती वाहने न्हवती त्यामुळे ८०-९० ने गाडी पळत होती. थोडे पुढे आल्यावर पेट्रोल भरून घेतले. मध्ये कुठे थांबायची इच्छा न्हवती. कानामध्ये मस्त आणि आवडीची गाणी वाजत होती. तसे खंबाटकी घाटापर्यंत पुण्यातल्या ३ रेडिओ स्टेशनची रेंज येते त्यामुळे असे काही वेगळे वाटत नाही. खंबाटकी घाट मस्त एन्जॉय केला. मला तिकडची आणि कात्रज घाटातली वळणे खूप आवडतात. गाडी चालवायला एक वेगळीच मजा येते तिकडे.

असो जेवण केले नसल्यामुळे पोटात कावळे ओरडत होते मग भूईज च्या पुढे एका ठिकाणी मस्त मिसळ पाव आणि पेप्सी मारली. दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडे पाय मोकळे केले आणि परत प्रवास चालू केला. लोक मिळेल त्या वाहनाने प्रवास करत होते अगदी उघड्या ट्रक मधून सुद्धा. मी ज्या ज्या वेळी एखाद्या वहनाच्या पुढे जायचो त्यावेळी तिकडचे लोक कुतूहलाने पहायचे रंगीत हेल्मेट, स्पोर्ट्स बाईक, हातात half gloves असा काही माझा अवतार होता.

     साताराच्या पुढे आल्यावर शेखरअण्णाचा अमेरिकेतून फोन आला मग काय अमेरिकेतून मित्र फोन करतोय म्हंटल्यावर गाडी बाजूला घेऊन त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. छान वाटले. सातारा कराड अंतर लगेच पार केले आणि कराड पलूस रस्त्याला लागलो. नेहमीप्रमाणे रस्ता एवढा काही चांगला नाहीये आणि त्यात एकपदरी असल्यामुळे तसा वेळ पण लागतो. एफ एम बंद झाल्यामुळे स्वताची Play list बनवून त्यातली गाणी ऐकत अंतर कपात होतो. मधल्या दोन तीन गावांमध्ये आठवडी बाजारामुळे गर्दी होती आणि त्यात उद्या दिवाळी असल्यामुळे गर्दी साहजिकच होती. मला काही करून अंधार पडायच्या आधी घर गाठायचे होते. साधारण ६.२० ला वगेरे पलूसच्या हद्दीत प्रवेश केला आणि काय विशेष माझ्या आवडीचे गाणे चालू झाले "वेडात मराठे वीर दौडले सात...". ह्यामधले शब्द ऐकून रक्त असे खवळते की काय सांगू,

     बरोबर ६.२५ ला घरच्या अंगणात गाडी न्हेउन उभी केली. १८६ किमी अवघ्या ३.३० तासात पार करून सुखरूप पोहोचलो. घरचे एकदम खुश झाले. आवरून घेतले लगेच. नेहमीप्रमाणे मम्मी ने मटन भाकरीचा बेत केला होता जेवण तयार होत होते त्याचा घमघमाट सुटला होता.

घरी पण मम्मी पप्पानी केक आणला होता. मम्मी, पप्पा, दीदी ने औक्षण केले आणि केक कट करून वाढदिवस साजरा केला. ह्यावेळी दीदी आणि मम्मीने SLR वापरून फोटो काढले. सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केले . जेवणाची चव अजूनहि तोंडावर आहे. अशारितीने अगदी धावपळीत पण पूर्ण धमालीत माझा पंचविसावा वाढदिवस पूर्ण झाला.

२५ मध्ये थांबून चालणार नाही अजून खूप काही करायचे शिल्लक आहे...भेटूच पुढच्या लेखा मध्ये