मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

रायरेश्वर-केंजळगड

पहिला थोडासा केंजळगड आणि रायरेश्वराचा इतिहास बघू आपण -

रायरेश्वर -
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः वाई - सातारा
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
किल्ल्याची उंची : ४०००फुट

पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
इतिहास : शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर. मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : रायरेश्र्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्र्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्र्वर, कोल्हेश्र्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा : रायरेश्र्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे
(सौजन्य: मंगेश बोचरे)

केंजळगड -
किल्ल्याची उंची : ४२६९ फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः महाबळेश्र्वर
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम
इतिहास : बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्र्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश
अधिकारी जनरल प्लिटझर याने दुर्गाचा ताबा घेतला. (सौजन्य: मंगेश बोचरे)

तसा हा वीकेंड म्हणजे लाँग वीकेंड होता पण शुक्रवार शनिवार विश्रान्तितच गेला. भटकंतीचा कार्यक्रम ठरला न्हवताच पण पंकज चा मेसेंज आला होता कि रायरेश्वर-केंजळगड करायचा का म्हणून. तसे रविवारी महत्वाचे काही काम न्हवते त्यामुळे लगेच होकार पाठवून दिला. शनिवारी रात्री उशिरा समजले कि उद्या निघायचे आहे. लगेच नेहमीच्या कार्यकर्त्यांना विचारून पहिले पण बहुतेक नकारच मिळाले सो तिघेच जायचे ठरले. ठरल्याप्रमाने कात्रज बोगद्याबाहेर भेटलो. भूषणशी तोंड ओळख जाली आणि आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत भोर मध्ये न्याहारी करायचे ठरले. सकाळी सकळी रस्त्यावर जास्ती वाहने न्हवती त्यामुळे गाडी चालवायला मजा येत होती. हायवे सोडून आम्ही भोर कडे निघालो. भोरच्या थोड्या अगोदर मस्त इंद्रधनुश दिसले मग काय लगेच गाडी थांबवून ते कॅमेऱ्यात टिपले. भोर मध्ये मस्त मिसळ पाव आणि चहा घेऊन रायरेश्वरच्या दिशेने वाटचाल चालू केली. भोर पासून एक ५ कि.मी. अंतरावर पंकजने गाडी थांबवलो बगतो तर तिकडे एका पठारावर एक वटवृक्ष एकटाच खडा होता खूप छान नजारा होता मोह आवरला नाही लगेच टिपला.
तिथेच आम्हाला एका विहिरीच्या काठावर असलेलेया झाडांवर वसलेली बया पक्षांची वस्ती दिसली. ह्या पक्षांबद्दल विशेष अशी माहिती जी पंकज ने सागितली ती म्हणजे नर बया मादी बया ला आकर्षित करण्यासाठी घर बनवतो घर पूर्ण होत आले कि तो मादीला बोलावतो आणि ज्याचे घर मादीला आवडते तिकडे मादी अंडी घालते. आम्हाला प्रत्क्याशात ते दृश्य पाहायला मिळाले. निसर्गाचे ते एक अनमोल दृश्य पाहून खूप आनद झाला.

तो कार्यक्रम आटोपून लगेच आम्ही लक्ष्याकडे वाटचाल चालू केली आणि कोरले गावात पोहोचलो. तिकडेच आमच्या गाड्या लावून आम्ही रायरेश्वराच्या पठाराकडे चालायला चालू केले. रस्ता म्हणजे तशी गाडी वाटच आहे जिकडे तुम्ही वरती पर्यंत गाडीने जाऊ शकता पण आम्ही चालणेच पसंद केले. रस्त्यात येणार धबधबे कॅमेऱ्यात टिपत, गप्पा मारत मारत आम्ही रायरेश्वरच्या जवळ पोहोचलो जिकडून लोखंडी शिड्या चालू होतात. तिथून फक्त अर्ध्या तासामध्ये वरती पोहोचते. वरती जाताना सगळीकडे निळी पिवळी फुले दिसतात. असे वाटते कि चादरच पसरली आहे.

आम्ही शिड्या चढून वरती गेलो मस्त गार हवा चालू होती आणि धुके होते. रायरेश्वराचे पठार खूप मोठे आहे. ११ कि.मी. लांबी आणि दीड किमी रुंदी असेल. एवढे काय आम्हनाला एका दिवसात शक्य नव्हते. आम्ही मंदिर शोधायला चालू केले. रस्त्या शेजारी पांढरी पिवळी फुले होती. वाटेतच एक पाण्याचे टाके दिसले टाके कसले छोटे तळेच होते. थोडा वेळ चाल्यावर एक वस्ती दिसली आणि तिकडेच रायरेश्वराचे मंदिर आहे. हीच ती जागा जिकडे महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. तिकडे एका गावकऱ्याने मंदिर उघडून दिले. आत जाऊन दर्शन घेतले मन प्रसन्न झाले दोन मिनिटांसाठी तो प्रसंग डोळ्यासमोरून गेला ज्यात शिवाजी महाराज आपल्या मावल्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतायेत. दर्शन घेऊन आम्ही त्या गावकर्याच्या घरी गेलो तिकडे चहा आणि पुठ्याच्या (मारी) बिस्किटे खाल्ली (हे मला तिकडेच समजले). निरोप घेऊन आम्ही केंजळगडाच्या दिशेने निघालो. शिड्या उतरून खाली येताना एक पुणेरी ग्रुप भेटला (हे लोक खूप पैसे मोजून रायरेश्वरला आले होते आणि आम्ही फक्त २ लि. पेट्रोल आणि खायचा खर्च पण असो).

रायरेश्वरपासून
तसा केंजळगड जवळ दिसतो पण तरी अर्धा तास जातोच पोचायला त्यात एका आजोबांनी आमची वाट चुकवलीच वाट शोधात शोधात एका वस्तीवर पोहोचलो जिकडे एका ताईंनी वाट सांगितली खरी पण आम्ही एक Right is the Right turn म्हणून एक Right घेतला खरा पण थोडे पुढे आल्यावर कळली कि आपण Wrong Turn घेतला ते. मग काय चिखलातून वाट शोधात, झुडपांचा सहारा घेत शेवटी एका ठिकाणी आम्हाला वाट सापडलीच. एकदा वाट सापडल्यावर पुढच्या अर्धा तासातच आम्ही केंजळगडाजवळ पोहोचलो. तिकडे एकाच दगडात कोरलेल्या ५२ ऐतिहासिक पायऱ्या आहेत. त्या चढून वरती गेले कि तुम्ही केंजळगडाच्या पठारावर पोहोचता.

वरती जास्ती काही शिल्लक नाहीये एका ठिकाणी २-३ मूर्ती आहेत, एक चुन्याचा घाना एक जुने कोठार येवडेच शिल्लक आहे. आम्ही रायरेश्वरच्या बाजूला असलेल्या कड्यावर जाऊन जवळ असलेल वडापाव खायचे ठरवले. वरती चालताना स्वर्गात असल्याचा अनुभव मिळत होता. एकदेपण पिवळ्या फुलांची चादर पसरली होती. काद्य्वर पोहचून आम्ही वडापाव वर ताव मारला जोडीला पुठ्ठा बिस्किटे होतीच. पंकजने जुनी गाणी चालू केली पण थोडे थांबायला सांगून मी "म्यानातून उसळे तरवारीची पात.." हे गाणे चालू केले..का कुणास ठाऊक पण हे गाणे एकले कि एक वेगळेच feeling येते. त्यानंतर पंकज ने त्याचा जुन्या गाण्यांचा नजराणा चालू केला. तिकडे तिघाचा एक फोटो घेतला. आणि लगेचच परतीची वाट पकडली.

परत
येताना खूपच कसरत करावी लागली. पूर्ण रस्ता निसरडा आणि चिखलाने माखला होता. मी तर म्हणजे ५-६ वेळा लोटांगण घातले (भटकंतीच्या भाषेत तोंड काळे करणे म्हणतात याला). काय करणार दुसरा काही पर्याय नसायचाच. तसा भूषण पण २-३ वेळा पडलाच. पण आमच्यातला एक वरिष्ट अनुभवी भटकंती कार्यकर्ता ज्याने त्याच्या ब्लॉगवर स्वताबद्दल लिहायचे टाळले आहे त्याने पण एक दोनदा लोटांगण घातलेच. असो खूप सारा उतार चढून कसेबसे एकदा आम्ही खालती पोहोचलो अजून आमच्या गाड्या ज्या कोरले गावात होत्या ते २ किमी दूर होते. ५- ५.३० च्या दरम्यान कोरले मध्ये पोहोचलो तिकडे आमच्या साहेब तर आडवेच झाले होते खूप कंटाळा आला होता..त्यात शहाणपणा म्हणजे Floaters घालून ट्रेक ला आलो होतो पायाची वाट लागली होतो एक फोड पण आला होता. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने वाटचाल चालू केली. पुन्हा भोर मध्ये इडली, उतप्पा यावर ताव मारून ७ च्या आसपास पुण्यनगरीत प्रवेश केला. खूप साऱ्या आठवणी, अनुभव, दृश्य मनात, डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून रायरेश्वर-केंजळगडाचा ट्रेक पूर्ण केला...