बुधवार, २ सप्टेंबर, २००९

पुरंदर - वज्रगड

तसा ह्या वीकेंड चा काही कार्यक्रम ठरला नव्हता पंकज श्रीकांत यांना मेला मेली जाली पण काहीच ठरले नव्हते त्यातच निखिलने गुरुवारी इमेल टाकला ३ पर्याय होते १. डूक्स नोज २. पुरंदर वज्र ३. आपापल्या घरी बसायचे :-) गणेश ने लगेच नक्की करून टाकले माझे काही नक्की नव्हते पण शुक्रवारी ठरलेच शनिवारी सकाळी किल्ले पुरंदर वज्रगड करायचा. शेवटच्या क्षणी निखिलचे रांजणवाडी उठल्यामुळे रद्द झाले मग काय फक्त मी आणि गणेश असा कार्यक्रम ठरत होता आणि त्यात डॉक्टर तयार जाले यायला मग मी, गणेश आणि डॉक्टर दोन गाड्यावरून जायचे ठरले.

ठरल्याप्रमाणे गणेश सकाळी ६.०० वाजता हजार झाला मीच जरा कंटाळा केला त्यामुळे जरा आवारेपर्यंत उशीर झाला आणि ७ वाजता गाडी सुरु केली. पावसाची चिन्ह नव्हती म्हणून रेनकोट घेतलेच नाहीत ज्याचा परत पश्चाताप झाला पण असो इतका पण पाउस नव्हता. कात्रज घाटातून जाताना मस्त वाटत होते दोनी बाजूला हिरवीगार झाडी मधून रस्ता त्यात थोडा थोडा पाउस अशामध्ये गाडी चालवण्याचा आनंद काही वेगळाच. जसा कात्रजचा बोगदा पार केला तसा पाउस चालू झाला पण आम्ही हळूहळू का होईना गाडी चालवत राहिलो

नसरापूर मधून मुख्य हायवे सोडून डावीकडे नारायणपूर साठी टर्न घेतला. मधेच बालाजी चे मंदिर लागते पण येताना जायचे ठरले सो आम्ही नारायणपूर मध्ये पोहोचलो जिकडे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. तिकडे चौकशी केली आणि पुरंदर कडे निघालो. पुरंदर च्या पायथ्याशी गेलो तर गावामध्ये कोणी दिसलेच नाही आणि त्यातच एक वरती जाणारी वाट दिसली मग काय आम्ही गाड्या तिकडे हाकायला चालू केल्या. वाट काही संपत नव्हती आणि चढ वाढत होता वाटले की पुरंदर बहुतेक गाडीवरूनच सर करावा लागतो. वरती पोहोचल्यावर आर्मी चा बोर्ड दिसला "हा परिसर आर्मी चा आहे अतिक्रमण करू नये" आत शिरलो तर उजव्या बाजूला एक पाण्याचा तलाव लागला थोडे पुढे गेल्यावर मुरारबाजींचा दोनी हातात तलवारी असलेला पुतळा लागला त्यांना वंदन करून पुढे गेलो.
नक्की समजत न्हवते कुठे आलो आहे ते तिकडे खूप साऱ्या पडक्या पण चांगल्या अवस्थेतल्या इमारती दिसत होत्या आश्चर्य म्हणजे जुनी चर्चची इमारत पण होती वाटले इंग्रजांनी बांधलेल्या इमारती असाव्यात. पुढे आलो तर एक हॉटेल लागले पोटात कावळे तर ओरडतच होते त्यात थंडी आणि पावसामुळे वाट लागलेली. हॉटेल मध्ये चौकशी केली तर तो म्हणाला सगळे सांगतो पहिला खाऊन घ्या. मग काय मस्त पोह्याचा बेत करायला सांगून आम्ही मागेच असलेल्या मंदिरात जाऊन पुरंदरेश्वाराच दर्शन घेतले.


परत येऊन तिकडेच एका पाण्याच्या चुलीवर हात शेकून घेतले थोडा बरे वाटले. पोहे आणि चहा घेऊन हॉटेल वाल्याचा निरोप घेतला. आतापर्यंत आम्हाला समजले होते की आम्ही पुरंदर वर आलो आहे मग ठरले की वज्रगड चा ट्रेक करायचा मग तिकडे निघालो. हॉटेल पासून सरळ गेले की डाव्या बाजूला एक मोठे तलाव लागते. जुन्या इमारती आहेतच साथीला एकंदर आर्मी ने सगळे वापरून टाकून दिले आहे नाहीतर खूप चागले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करता आले असते अजूनही करता येईल.

थोडे पुढे आलो तर महाराजांचा अर्धाकृती पुतळा लागला मस्तक टेकून पुढे वज्र च्या दिशेने वाटचाल चालू केली. वज्र साठी पुतळ्यापासून डाव्या बाजूने जावे आणि नंतर पडक्या इमारतीच्या पासून उजवीकडे वळण घ्यावे. चढण लागते पायवाट आहे. वाटेवर खूप सारे कोळ्यांचे जाळे लागले त्यात लाल कलर चे कोष्टी होते मग काय थोडे फोटो घेतले आणि वज्रची वाट चढू लागलो.
जास्ती नाही फक्त २०-२५ मिनिटात वज्रगड चे बुरुज आणि दरवाजा लागतो. गडावर जास्ती काही नाही राहिले वज्र मारुती चे मंदिर छोटे पाण्याचे टाके, एक महादेवाचे मंदिर पण आहे जिकडे ३-४ लोक राहू शकतात. ३-४ पडलेले बुरुज आणि थोडी तटबंदी शिल्लक आहे.

दरवाजाच्या उजव्या बाजूला गेले कि तिकडे मराठा साम्ज्र्याचे निशाण फडकत असलेले दिसते. तिकडे जाऊन आम्ही मानवंदना दिली आणि वज्रगडाचा निरोप घेतला.
पुढच्या ३० मिनटात आम्ही परत पुरंदर किल्ल्यावर आलो आणि आता पुरंदर ची वाट पकडली. पुन्हा थोड्या चढणीचा रस्ता आहे खूप काही अवघड असे काही नाही. १५-२० मिनटात पहिला दरवाजा लागतो जिकडे एका बाजूला म्हसोबाचे तर दुसऱ्या बाजूला दगडात असलेली हनुमानाची मूर्ती दिसते. दरवाजातून वरती आल्यावर परत एक दरवाजा लागतो तिकडे २ बुरुज पण आहेत. आतमध्ये २ छोटे पाण्याचे टाके आहेत. तिकडून पुढे एक चढ चढून गेल्यावर एक दगडी जिना लागतो क्षणभर वाटत होते हि वाट स्वर्गात जातीये कारण पूर्ण धुक्यात हरवलेली होती ती वाट. वरती गेल्यावर एक सुंदर महादेवाचे मंदिर दिसले दर्शन घेऊन लगेच परतीचा रस्ता पकडला.

तसे पहिले तर पुरंदर हा खूप मोठा किल्ला आहे. खूप वेळ आणि धुके नसलेलं वातावरव पाहिजे म्हणजे तुम्हाला पुरंदरची भव्यता कळेल. थोडा वेळ वरती भटकून आम्ही परतीची वाट पकडली. खालती यायला जास्ती वेळ लागला नाही. जिकडे गाड्या लावल्या होत्या तिकडे पोहचून मस्त भेळ आणि चहा मारला आणि परतीची वाट पकडली.

येताना नारायणपूर ला जाऊन एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले. तिकडून डॉक्टर हॉस्पिटलला जायचे असल्यामुळे गणेशची गाडी घेऊन पुढे निघून गेले. मी आणि गणेश बालाजी चे दर्शन घेण्यासाठी थांबलो. बालाजी मंदिर आणि तिथल्या व्यस्थेबद्दल एक गोष्ट नमूद करवी वाटते कि स्वच्छता शिस्त पहायची असेल तर आवश्य भेट द्या. चप्पल, तुमच्या बरोबर असलेले साहित्य, मोबाइल, कॅमेरा ठेवण्यासाठी वेग वेगळ्या सोयी केल्या आहेत. जिकडे तिकडे त्यांचे कामगार फिरत असतात कचरा गोळा करण्यासाठी.

मंदिरात आत प्रवेश केल्यावर एक वेगळेच वातावरण आहे. तिथले गार्डस तुम्हाला मदत करतात कुठेही इकडे तिकडे भटकता येत नाही सगळ्या देवतांना एका विशिष्ट क्रमाने जावे लागते. सगळ्यात शेवटी प्रसाद दिला जातो एकाच लाडू मिळतो पण त्याची चव अजून तोंडावर आहे. तिथल्या कर्मच्यार्यानी आम्हाला जेऊन जायची विनंती केली पण लवकर परत यायचे असल्यामुळे जेवण करता आले नाही. दर्शन घेऊन प्रसन्न मनाने आम्ही पुण्याची वाट पकडली.

अश्या तरीने आम्ही पुरंदर वज्र ट्रेक संपवून ४ वाजता पुण्यनगरीत प्रवेश केला.